file photo
file photo 
नागपूर

चार प्राध्यापकांनी मांडली कोविड-19च्या निर्जंतुकीकरणासाठी या यंत्राची संकल्पना 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : संपूर्ण जगाला सध्या कोरोना विषाणूचा सामना करावा लागत आहे. परिस्थिती अनुकूल नसली तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या चार संशोधक प्राध्यापकांनी कोविड-19च्या निर्जंतुकीकरणासाठी मल्टीफोकल निर्जंतुकीकरण यंत्र आणि ड्रोन आधारित दूषित पृष्ठभाग निर्जंतुकीकरण यंत्राची निर्मिती करण्यात यश मिळविले आहे. या संशोधनाची पेटंटसाठी नोंदणी करण्यात आलेली आहे. 

कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे प्रत्येक देशात बाधित लोकांची चाचणी, अलगीकरण आणि उपचार करणे यांसारख्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव देशभर वाढत चाललेला आहे. त्याचा प्रसार थांबविणे हे मोठे आव्हान आहे. त्याचा प्रसार थांबविण्याची एक पद्धत म्हणजे दूषित पृष्ठभाग आणि निर्जंतुकीकरण करणे एवढाच आहे. यासाठी अनेक पद्धतींचा उपयोग करण्यात येतो. मात्र, कोणत्याही पद्धती 100 टक्के कार्यक्षम नाहीत. त्यामुळे स्वतंत्र पद्धती वापरून निर्जंतुकीकरणाच्या दोन किंवा अधिक पद्धतींचे संयोजन 100 टक्के कार्यक्षम आहे हे सिद्ध झाले आहे.

याची कार्यक्षमता साध्य करण्यासाठी एकाच 'डिव्हाइस'मध्ये दोन किंवा अधिक निर्जंतुकीकरण तंत्र एकत्र करणे ही काळाची गरज आहे. हे लक्षात घेता भौतिकशास्त्र विभागाचे प्रो. डॉ. संजय ढोबळे, एलआयटीच्या रसायन अभियांत्रिकी विभागाचे प्रो. भारत ए. भानवसे, डॉ. निशिकांत राऊत आणि फार्मास्युटिकल सायन्स विभागाचे डॉ. दादासाहेब एम. कोकरे यांनी एकत्र येत, अतिनील, रासायनिक आणि उष्णता निर्जंतुकीकरण पद्धतींसह मल्टीफोकल निर्जंतुकीकरण डिव्हाइसचे डिझाइन आणि उपकरण बनवण्याची संकल्पना मांडली. विशेष म्हणजे त्यास पेटंटसाठी दाखल केले आहे. 
 
अधिक वाचा : आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती चौहानच्या मदतीसाठी सरसावले असंख्य हात 

अशी आहे यंत्राची संकल्पना 
उपकरणांमध्ये यूव्ही लाइट इरिडिएशन समाविष्ट आहे, जे 200 ते 350 nm पर्यंत तरंग दैर्ध्यसह उच्च तीव्रतेचे उत्सर्जन करते. बहुतेक सूक्ष्मजीव, जिवाणू, विषाणू इत्यादींसाठी अतिनील किरणांची उच्च पातळी प्राणघातक मानले जाते. त्याशिवाय अतिनील किरणांचे तरंग, पृष्ठभागावर हवायुक्त रोगकारकांपेक्षा अधिक प्रभावी आहे. अतिनील प्रकाश सतत किंवा स्पंदित असू शकतो. केमिकल बेस्ड निर्जंतुकीकरणात नियमितपणे कार्यरत, कमी प्रभावी आणि सहज उपलब्ध रासायनिक जंतुनाशक जसे क्‍लोरीन आणि क्‍लोरीन संयुगे, फॉर्मल्डिहाइड, ग्वेल्टरल्डिहाइड, क्वॉटरनरी अमोनियमचा वापर करण्यात आला. यंत्रातील गरम हवेच्या धक्‍क्‍याने निर्जंतुकीकरण केले जाते. अहवालानुसार हा विषाणू तापमानात 56 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात मारला जाऊ शकतो. सध्याच्या प्रणालीमध्ये तापमानात 60 डिग्री सेल्सिअससह वायू वाहण्याचे नियोजन आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT